मुलाकात हुई, क्या बात हुई? बंडानंतर अजित पवार यांची पहिल्यांदाच शरद पवार यांच्यासोबत गुप्त बैठक

| Updated on: Aug 12, 2023 | 11:18 PM

VIDEO | बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गुप्त बैठक, पुण्यातील पुण्यातील कोरेगाव पार्क येथे झाली भेट, राज्याच्या राजकारणातील पडद्याआड नेमकं काय सुरु?

मुंबई, १२ ऑगस्ट २०२३ | बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या पहिल्याच गुप्त भेटीनं राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. या भेटीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. माध्यमांना चुकवत अजित पवार आणि जयंत पाटील बैठकीला पोहोचले होते. या भेटीबाबत आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. “आमच्यासोबत असलेल्या पक्षांच्या संघटनात्मक चर्चेत आम्हाला पडण्याचं काही कारण नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे की भाजपाच्या विरोधात ताकदीने लढण्याची तयारी ठेवणाऱ्या लोकांना आम्ही बरोबर घेऊन चालणार आहोत. अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे कोण कुठे भेटलं याच्याशी आम्हाला काही घेणं नाही.”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. तर राहुल गांधी आणि त्यांची भेट झाल्याची माहिती माझ्याकडे आहे. पवार साहेबांनी भाजपासोबत अशी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे या गुप्त बैठकीचा अर्थ आज काढणं कठीण आहे. पण त्यांच्या मनात काय हे आज आम्ही सांगू शकत नाही. ते राष्ट्रवादीलाच माहित., असं विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. यासह “शरद पवार यांनी चार दिवसापूर्वीच सांगितलं आहे की भाजपासोबत जाणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या त्यांच्यावर विश्वास आहे. पण अशा गुप्त भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. “, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं.

Published on: Aug 12, 2023 11:17 PM
पुण्यातील सोहळ्यात शिंदे यांच्या नावाची खुर्ची, पण शिंदे यांची गैरहजेरी; काय कारण? बघा स्पेशल रिपोर्ट
मेधा कुलकर्णी यांच्या फेसबूक पोस्टमधून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा अन् चंद्रकांत दादांचं मौन!