लोकसभेचं बिगुल वाजलं, इनकमिंग सुरू? मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम अन् शिवसेनेत प्रवेश

| Updated on: Jan 15, 2024 | 11:58 AM

लोकसभेच्या तोंडावर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यातून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा जोरदार उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

मुंबई, १५ जानेवारी २०२४ : ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून काँग्रेससोबत असलेलं देवरा कुटुंब आता दुरावलंय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे बडे नेता मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. माजी केंद्रीय राज्य मंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवेरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकलं. लोकसभेच्या तोंडावर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यातून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा जोरदार उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. ठाकरेंची फोटोग्राफी आणि आपल्या शेतीवरून शिंदेंनी ठाकरेंवर खोचक टीका केलीये. उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधून बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता मोहिमेवरून जोरदार टोला लगावला. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. स्वच्छतेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुंपली. बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jan 15, 2024 11:58 AM
राम मंदिरावरून ठाकरे-फडणवीस यांच्यात ‘सामना’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला फडणवीसांचं काय प्रत्युत्तर?
पक्ष, बाप, चोर आणि राजकारणाला आला जोर; संजय राऊत यांचे इंद्रिय निकामी, कुणाची खोचक टीका?