Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी व्हीआयपी दर्शन बंद अन् भाविकांच्या लांबलचक रांगा

| Updated on: Aug 05, 2024 | 12:39 PM

नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे. भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाकडून देखील पहाटे चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्यात आले असून भाविकांची मोठी दर्शन रांग पहावयास मिळत आहे.

Follow us on

आजपासून श्रावण मासास प्रारंभ झाला असून श्रावणातील पहिल्याच दिवशी सोमवार आल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे. भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाकडून देखील पहाटे चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्यात आले असून भाविकांची मोठी दर्शन रांग पहावयास मिळत आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आल्यामुळे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात लांब रांगा पहावयास मिळत असून मंदिर परिसर भाविकांनी फुललं आहे. दरम्यान, राजशिष्ट्यचारातील व्यक्ती वगळता अन्य व्यक्तींना व्हीआयपीना दर्शन बंद करण्यात आले आहे. पूर्व दरवाजा दर्शन बारीतून भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार आहे. या ठिकाणी साधारणत: सहा ते सात हजार भाविक असतील, या गृहितकाने दर्शन रांगेचे नियोजन, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इ शौचालयाचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या उत्तर महाद्वारातील गर्दी कमी करण्यासाठी देणगी दर्शन घेणाऱ्या भाविकांना पूर्व दरवाजाच्या दर्शनबारीच्या उत्तर बाजूस असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे.