Bhimashankar : हर हर बोले…नम:शिवाय, पहिल्या श्रावणी सोमवारी श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांनी फुललं
श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून गर्दी दिसून येत आहेत, भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार यात्रेसाठी देवस्थानाने पूर्ण तयारी केली असून गाभाऱ्यातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन लवकर व्हावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. तर पोलिसांच्या बंदोबस्तासह देवस्थानाने खासगी मिनीबस भाविकांसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमावस्या नंतर श्रावणाची सुरुवात ही सोमवारने होण्याचा दुर्मिळ योग आल्याने आज भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. यातच पूर्ण श्रावण महिना मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी श्रीक्षेत्र भीमाशंकरमध्ये पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक दाखल होत आहेत. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकर हिरवळीने सजलं आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून गर्दी दिसून येत आहेत, भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार यात्रेसाठी देवस्थानाने पूर्ण तयारी केली असून गाभाऱ्यातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन लवकर व्हावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. तर पोलिसांच्या बंदोबस्तासह देवस्थानाने खासगी मिनीबस भाविकांसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला श्रावणी सोमवार निमित्त देशभरातून भाविक बारा ज्योतिर्लिंगापैकी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दाखल झाले आहेत, रात्री बारा वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून भीमाशंकरचा संपूर्ण परिसर दाट धुक्यात हरवला आहे. तर देवस्थान कडून श्रावण यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.