वाह क्या बात है ! नेत्यांची पोस्टरबाजी न करता शिवरायांच्या जीवनाची माहिती देणारे फ्लेक्स
VIDEO | शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर माहिती देणारे कुठं लावले आहेत फ्लेक्स?
हिंगोली : येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील वेगवेगळे पैलू या फ्लेक्सवर साकारण्यात आले आहे. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने हे फ्लेक्स लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंगोलीतील छत्रपती शिवाजी महारात पुतळा परिसरात राजकीय नेत्याची पोस्टरबाजी न करता सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने हे आकर्षक फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या ३०० फूट उंचीच्या फ्लेक्सच्या माध्यमातून शिवरायांचे विचार, शिवरायांच्या जीवनावर आधारित मजकूर नागरिकांना माहित व्हावा म्हणून लावण्यात आला आहे. हे पोस्टर हिंगोलीकरांसह सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत, इतकेच नाही तर या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.