गोकुळाष्टमी निमित्त पंढरीच्या विठुरायाला सजवले श्रीकृष्णाच्या रूपात, बघा मोहक साज

| Updated on: Sep 07, 2023 | 4:20 PM

VIDEO | गोकुळाष्टमीनिमित्त पंढरीचा विठुराया सजला श्रीकृष्णाच्या रूपात, गोकुळाष्टमीनिमित्त श्री विठ्ठलाला श्रीकृष्णाचे रूपात सजवून गुलाल आणि फुलांची उधळण करण्यात आली होती ... बघा आकर्षक आणि मनमोहक रूप

सोलापूर, ७ सप्टेंबर २०२३ | गोकुळाष्टमीनिमित्त पंढरपूरमध्ये रात्री बारा वाजता श्री विठ्ठलाला श्रीकृष्णाचे रूपात सजवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. गोकुळाष्टमीनिमित्त श्री विठ्ठलाला श्रीकृष्णाचे रूपात सजवून गुलाल आणि फुलांची उधळण करण्यात आली होती तर आर्य वैश्य कोमटी समाजाच्या श्री कृष्ण मंदिरात देखील कृष्णजन्म मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विठ्ठल हा श्रीकृष्णाचा आवतार असल्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या प्रतिकात्मक मूर्तीचे विधिवत पुजन करुन पाळण्यात ठेवून देवाचा पाळणा म्हणण्यात आला. यावेळी अनेक महिला भाविकांनी श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी उत्सव श्री विठ्ठल मंदिरात साजरा करण्यात आला. बघा श्री पंढरीच्या विठुरायाचं लोभस आणि मनमोहक रूप

Published on: Sep 07, 2023 04:20 PM
Abhijeet Bichukale यांना राज ठाकरे यांच्याबद्दल कोणती गोष्ट खुपते? Watch Video
‘पूर्वग्रह दूषित असलेली माणसं राजकारणात बिबा घालताय’, शरद पवार यांच्यावर कुणाची अप्रत्यक्ष टीका?