हाजी मलंग दर्ग्यावर ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट सामना, मजारवर तगडा पोलीस बंदोबस्त
माघी पौर्णिमेनिमित्त मलंग गडावरील हाजी मलंग दर्ग्यावरील मजारवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आरती
कल्याण : माघी पौर्णिमेनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याण येथील मलंग गडावरील हाजी मलंग दर्ग्यावर असणाऱ्या मजारवर आरती करणार आहेत. स्वर्गीय आनंद दिघे यांनी ही चळवळ सुरू केली होती. हाजी मलंग गडाचं नाव हे श्रीमलंग असून तेथे दर्गा नसून ते स्थळ नवनाथ देवाचं श्रद्धास्थान आहे, असा दावा ठाण्यातील शिवसैनिकांचा आहे. तर ही चळवळ आनंद दिघे यांच्यापासून चालत आहे आणि याचा वसा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालवत आहे. आज एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा या हाजी मलंग दर्ग्यावर येणार असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे हाजी मलंग गडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे . तर आज ठाकरे गटातील राजन विचारे आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे सुद्धा हाजी मलंग दर्ग्यावर येणार असून तेही मजारवर आरती करणार आहेत.
Published on: Feb 05, 2023 02:23 PM