क्या बात है! तब्बल २३ हजार ८०० स्क्वेअर फुटाचं शिवरायांचं विश्वविक्रमी पेंटिंग पाहिलंत का?

| Updated on: Feb 19, 2023 | 6:02 PM

VIDEO | उस्मानाबाद येथे श्रीमंतयोगी युवा मंचाने साकारली छत्रपती शिवाजी महाराज यांची २३ हजार ८०० स्क्वेअर फुटाची कोलाज पेंटिंग

उस्मानाबाद : आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे श्रीमंतयोगी युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची २३ हजार ८०० स्क्वेअर फुटाची कोलाज पेंटिंग बनविण्यात आली आहे. देशपातळीवरील रेकॉर्ड करणारी तब्बल २३ हजार ८०० स्क्वेअर फुट कोलाज पेंटिंग काढण्यात आली आहे. यांची कोलाज पेंटिंग साकारुन विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे. कोलाज पेंटिंग आर्ट ही शिवछत्रपती यांची प्रतिमा आकारण्यात आली असून यामध्ये वेस्टेज बॅनर, काळा आणि पांढऱ्या कलरचा २५ किलो रंग वापरण्यात आला असून १२५ किलो रद्दी पेपर वापरण्यात आला आहे. ही प्रतिमा २३ हजार ८०० स्क्वेअर फूट साकारण्यासाठी ३२ तासाचा अवधी लागला आहे.

Published on: Feb 19, 2023 06:02 PM
‘या’ भाजप नेत्यानं संजय राऊत यांची काढली औकात, काय म्हणाले बघा व्हिडीओ
कसबा निवडणुकीत उमेदवार नवा ट्विस्ट, काँग्रेसचा मोठा नाराज नेता प्रचारात उतरणार