उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीला 62 किलोचा प्रसाद!

| Updated on: Jul 26, 2022 | 1:38 PM

"उद्धवजी यांच्या वाढदिवस निमित्त त्यांचे वय जितके होते आहे तितका म्हणजे 62 किलोचा प्रसाद आज दाखवला. देशाची सेवा करण्यासाठी उद्धव जी यांना यश मिळो."

पुणे: उद्या उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस (Uddhav Thackrey Birthday) आहे. सेनेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी आज दगडुशेठ गणपतीला (Dagdusheth Ganpati Pune) आरती केली. वाढदिवसाचं औचित्य साधून 62 किलोचा प्रसाद आज दाखविण्यात आलाय. यानिमित्ताने शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे TV9 शी बोलताना म्हणाल्या,”उद्धवजी यांच्या वाढदिवस निमित्त त्यांचे वय जितके होते आहे तितका म्हणजे 62 किलोचा प्रसाद आज दाखवला. देशाची सेवा करण्यासाठी उद्धव जी यांना यश मिळो. देवाने त्यांना शक्ती आणि युक्ती द्यावी ही गणेशाला प्रार्थना. बाळासाहेबांचे वाक्य मी ऐकल आहे की, देवाच्या देवळात येताना राजकारणाचे (Politics) जोडे बाहेर काढून यायचे असतात. त्यामुळे आम्ही कोणाच्याही विरोधात जाऊन आरती करत नाही. राजकीय मतभेद असतील तरी सुद्धा ते देवाच्या दारात नाही. बावनकुळे यांना जी दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे त्यामुळे त्यांना मातोश्रीच्या आत मध्ये काय आहे ते दिसत आहे. ऊर्जामंत्री असल्यामुळे त्यांनी काही यंत्र बसवला असावा.आदित्य ठाकरे यांचे दौरे पाहता बाळासाहेब यांच्या दौऱ्यांची आठवण येते आहे.”

 

Published on: Jul 26, 2022 01:36 PM
Video: अभिनेता रणवीर सिंहच्या अडचणीत वाढ, चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घालूनपाडून बोलणं मान्य नाही- आशिष शेलार