One Nation, One Election : लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती? मतदानात काय झालं?
सध्या लोकसभेत भाजपच्या एनडीएकडे २९२ तर इंडिया आघाडीकडे २४० सदस्य आहेत. 'वन नेशन, वन इलेक्शन' साठी ३६२ ची गरज होती. 'वन नेशन, वन इलेक्शन' या विधेयकासाठी आधी इलेक्ट्रॉनिक मतदान झालं. ज्यात २२० विधेयकाच्या बाजूने तर १४९ विधेयकाच्या विरोधात होते.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विधेयकावरून नुकतंच लोकसभेत मतदान पार पडलं. पण लोकसभेत हे विधेयक पास होऊ शकलं नाही. देशातील सर्वच निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात असा भाजपचा आग्रह आहे. मात्र अनेक पक्षांनी याला विरोध केल्यानंतर यावर मतदान घेण्यात आलं. पण अशा महत्त्वाच्या विधेयकावर केवळ मतदानच नव्हे तर सरकारकडे दोन तृतीयांश मतदान गरजेचं असतं. मतदानानंतर सरकारकडे दोन तृतीयांश मतदान सरकारकडे नसल्याची टीका विरोधकांनी केली. सध्या लोकसभेत भाजपच्या एनडीएकडे २९२ तर इंडिया आघाडीकडे २४० सदस्य आहेत. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ साठी ३६२ ची गरज होती. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विधेयकासाठी आधी इलेक्ट्रॉनिक मतदान झालं. ज्यात २२० विधेयकाच्या बाजूने तर १४९ विधेयकाच्या विरोधात होते. या मतदानावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर इतर काही सदस्यांनी मतदानात भाग घेतला. तर यावेळी विधेयकाच्या बाजूने २६९ तर विधेयकाच्या विरोधात १९८ मतं पडली. आता पुन्हा हे विधेयक JPC कडे पाठवलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट