Kalyan रेल्वे स्थानकात अपघात, धावत्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधून उतरायला गेला अन्…

| Updated on: Oct 06, 2023 | 1:06 PM

VIDEO | तुम्ही धावत्या ट्रेनमधून उतरता का? किंवा धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करता का? तर जरा जपून... मुंबई डेक्कन एक्स्प्रेसला कल्याण रेल्वे स्थानकात थांबा नसताही धावत्या गाडीतून उतरणाऱ्या दोन प्रवाशांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर एक प्रवासी जखमी झाला आहे.

कल्याण, ६ ऑक्टोबर २०२३ | तुम्ही धावत्या ट्रेनमधून उतरता का? किंवा धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करता का? तर जरा जपून… कारण आज कल्याण रेल्वे स्थानकात एक अपघात घडला आहे. यामध्ये एकाच्या चुकीमुळे दुसऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. पुण्यावरून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या मुंबई डेक्कन एक्स्प्रेसला कल्याण रेल्वे स्थानकात थांबा नसताही धावत्या गाडीतून उतरणाऱ्या दोन प्रवाशांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर एक प्रवासी जखमी झाला आहे. ही घटना सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला असून रियाज अली आणि फरीद अन्सारी असे दोघांची नावे असून हे दोघे पुण्यावरून कल्याणला येण्यासाठी एक्सप्रेसमध्ये चढले होते मात्र एक्सप्रेस गाडीला कल्याणमध्ये थांबा नसताना दोघांनी उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फरीद अन्सारी याचा मृत्यू झाला तर रियाज अलीवर उपचार सुरू आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर ही घटना घटली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

Published on: Oct 06, 2023 01:06 PM
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत वंचित सहभागी होणार? पडद्यामागं काय घडतंय?
‘सर्वच राजकीय पक्ष भाजप पक्षात विलीन करावेत’, कुणी लगावला खोचक टोला?