Telangana Election Results 2023 : सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं BRS चं स्वप्न भंगणार? कॉंग्रेसला येणार अच्छे दिन?

| Updated on: Dec 03, 2023 | 10:32 AM

तेलंगणामध्ये कॉंग्रेस आणि बीआरएसमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस सत्ता स्थापनेच्या तयारीत असून आतापर्यंतच्या आलेल्या कलांमध्ये तेलंगणात बीआरएसला धक्का बसल्याचे समोर येतं आहे. तेलंगणा राज्यात काँग्रेस सध्या स्पष्ट बहुमत मिळवतांना दिसत आहे.

मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होत आहे. तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुकीचे कौल येण्यास सुरूवात झाली आहे. सध्या सुरु असलेया मतमोजणीच्या आधारे कॉंग्रेस सत्तेच्या जवळपास असल्याचे दिसून येत आहे. तेलंगणामध्ये कॉंग्रेस आणि बीआरएसमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस सत्ता स्थापनेच्या तयारीत असून आतापर्यंतच्या आलेल्या कलांमध्ये तेलंगणात बीआरएसला धक्का बसल्याचे समोर येतं आहे. तेलंगणा राज्यात काँग्रेस सध्या स्पष्ट बहुमत मिळवतांना दिसत आहे. अशातच काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना एका हॉटेलमध्ये नेण्याचं ठरवलं आहे. तेलंगणामध्ये कॉंग्रेस विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आताचा कल पाहता कॉंग्रेस ६५ जागांवर आघाडीवर आहे. केसीआर यांचं सलग तिसऱ्यांना तेलंगणामध्ये सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगताना दिसतंय, अशी चर्चा होताना दिसतेय.

Published on: Dec 03, 2023 10:32 AM