कांदा रडवणार? ऑक्टोबर महिन्यात कांदा महागण्याची भीती, किती रुपयांनी दर वाढणार?

| Updated on: Sep 19, 2022 | 8:58 AM

संभाव्य वाढीव मागणीचा विचार करता कांद्याचा तुटवटा जाणवण्याची भीती आहे. त्यामुळे कांद्याची कमतरता भासू लागल्यास कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कांदा प्रतिकिलो 40 रुपयांपर्यंत जाणार?

नियमित जेवणातला महत्त्वाचा भाग असलेला कांदा (Onion Rates) आता सर्वसामान्यांना रडवण्याची दाट भीती व्यक्त केली जातेय. ऑक्टोबरमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये (Karnataka Onion News) काढणीला आलेल्या कांद्याचं पावसामुळे नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना तर फटका बसला आहेच. शिवाय याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरही होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कर्नाटकातील कांद्याच्या नुकसानीमुळे कांद्याच्या दरवाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर 35 ते 40 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवलीय. गणेशोत्सवानंतर येणाऱ्या दसरा आणि दिवाळी या सणांवेळी कांद्याची मागणी वाढते. परराज्यातील कांद्यापेक्षा महाराष्ट्रातील कांद्याचा (Maharashtra Onion News) दर्जा हा तुलनेनं अधिक चांगला असतो. मात्र आता संभाव्य वाढीव मागणीचा विचार करता कांद्याचा तुटवटा जाणवण्याची भीती आहे. त्यामुळे कांद्याची कमतरता भासू लागल्यास कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच येत्या महिन्यात कांद्याचे ते 35 ते 40 रुपये किलोपर्यंत जाण्याची दाट भीती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेटही कोलमडण्याची भीती आहे.

 

Published on: Sep 19, 2022 08:58 AM
देशात ‘लम्पीचा’ कहर; देशभरात 82 हजार जनावरांचा मृत्यू; राज्यातील मृत्यूचा आकडाही मोठा
Pune Corona Update : पुणेकरांनो सावधान! गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं चिंता