Maratha Reservation : … हे मान्य करा, सर्व विषयच संपतो; मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत ऑनलाईन बैठकीत काय म्हणाले जरांगे पाटील?

| Updated on: Jan 03, 2024 | 12:50 PM

गावा-गावातील नोंदी तपासल्या जाणार असल्याचं आश्वासन सरकारने दिलं मात्र गावा-गावात नोंदी तपासल्या गेल्या नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. दरम्यान, २० जानेवारीच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येऊन मुंबईत रवाना होणार आहेत.

मुंबई, ३ जानेवारी २०२४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काल ऑनलाईन बैठक झाली. मात्र मनोज जरांगे पाटील हे सगेसोयरे हा शब्द आणि २० जानेवारी रोजी होणाऱ्या मराठा आंदोलनावर ठाम आहेत. शिंदे समितीकडून मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू होतं आणि त्यासंदर्भातील अहवालही सरकारला देण्यात आला. मात्र गावा-गावातील नोंदी तपासल्या जाणार असल्याचं आश्वासन सरकारने दिलं मात्र गावा-गावात नोंदी तपासल्या गेल्या नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. दरम्यान, २० जानेवारीच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येऊन मुंबईत रवाना होणार आहेत. त्यामुळे जरांगेंनी मुंबईत न येता सरकारला सहकार्य करावं, यासाठी ऑनलाईन बैठकीचं आयोजन करण्यात आलं. पण २० जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणावर मार्ग काढावा नाहीतर ऐकणार नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशाराच दिलाय.

Published on: Jan 03, 2024 12:46 PM
सयाजी शिंदे थेट अंतरवाली सराटीत अन् घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, काय झाली दोघांत चर्चा?
इंडिया आघाडीतील काँग्रेसचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित? ‘या’ ९ राज्यात काँग्रेस एकत्र लढणार