आमदारांना घोडे म्हणण्याचं पाप गाढवच करू शकतात, घोडेबाजारावरून किरीट सोमय्याची फटकेबाजी
आमदारांना घोडे म्हणण्याचे काम गाढवच करू शकतात, अशी टीका भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. रश्मी ठाकरे तसेच अजित पवार यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.
आमदारांचा घोडेबाजार महाराष्ट्रात सुरू आहे. तर सामनाचे संपादक आणि पोलीस महासंचालक यांना विनंती आहे, की त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेऊन बाजार मांडणाऱ्यांवर कारवाई करावी. निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो गुन्हा आहे. मात्र अशाप्रकारे आमदारांना घोडे म्हणण्याचे काम गाढवच करू शकतात, अशी टीका भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. रश्मी ठाकरे तसेच अजित पवार यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. आमदारांचा घोडेबाजार भाजपा करत असल्याची टीका सत्ताधारी पक्षाकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
Published on: Jun 05, 2022 03:29 PM