Pandharpur Wari | लस घेतलेल्यांनीच वारीसाठी पंढरपुरात यावं, दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश

| Updated on: Jun 14, 2021 | 2:39 PM

येत्या 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी (Ashadi Ekadashi 2021) पंढरपूरला (Pandharpur) जाण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. मात्र तरीही वारकरी पायी वारीचा आग्रह धरत आहेत. अशातच पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे.

येत्या 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी (Ashadi Ekadashi 2021) पंढरपूरला (Pandharpur) जाण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. मात्र तरीही वारकरी पायी वारीचा आग्रह धरत आहेत. अशातच पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश करताना वाखरी येथे सर्व वारकऱ्यांचे दोन डोस झालेले प्रमाणपत्र तपासूनच पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाईल, असं नगराध्यक्षा साधना भोसले (Sadhana Bhosale Pandharpur) यांनी सांगितले.

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्यावर्षी आषाढी वारी रद्द झाली होती. यंदाही या वारीवर कोरोनाचे सावट आहे. पालखी मार्गावर येणाऱ्या अनेक गावांनीदेखील पायी वारीला विरोध केला आहे. सगळ्यात शेवटचं गाव असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क पायीवारी काढल्यास वाखरी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करणार असल्याचा इशारा दिला आहे.