Russia-Ukraine Crisis: यूक्रेनमध्ये विद्यार्थ्यांसोबत ज्योतिरादित्य शिंदेंचा मराठीतून संवाद

| Updated on: Mar 02, 2022 | 1:28 PM

युक्रेनवरील रशियन हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे भारतानंही युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा (Operation Ganga) हाती घेतले आहे.

Russia-Ukraine Crisis: युक्रेनवरील रशियन हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे भारतानंही युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा (Operation Ganga) हाती घेतले आहे. या अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने चार मंत्री युक्रेनशेजारील देशात पोहोचले आहेत. यात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांचाही समावेश आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे त्या देशाच्या हद्दीतून विमान उड्डाणास बंदी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोल्दोव्हा आणि बुखारेस्टमार्गे भारतात आणले जाणार आहे. बुखारेस्टमध्ये आणल्या गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संवाद साधला. त्यात काही महाराष्ट्रीयन विद्यार्थीदेखील होते. सिंधिया यांनी त्यांच्याशी मराठीतून संवाद साधला, तसेच तुम्ही काळजी करू नका, आपण लवकरच भारतात परतू, असे आश्वासन दिले.

Published on: Mar 02, 2022 01:28 PM
रशियाने केला खारकीवमधील लष्करी अकादमीवर हल्ला
Russia-Ukraine Crisis: युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पुण्यात बैठक