विधानसभा निवडणुकीत कोणाचं पारडं जड? महायुती की मविआ? IANS अन् MATRIZE चा ओपिनियन पोल समोर

| Updated on: Nov 11, 2024 | 12:05 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकाला महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहेत. तर त्याचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराचा धडाका लावला आहे. अशातच निवडणुका होण्यापूर्वीच IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीचं पारडं जडं दिसतंय. IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE चा ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार, महायुतीला १४५ ते १६५ जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ७० जागांपैकी ३१ ते ३८ जागा, विदर्भातील एकूण ६२ जागांपैकी ३२ ते ३७ जागा, मराठवाड्यात एकूण ४६ जागांपैकी १८ ते २४ जागा महायुतीच्या पारड्यात पडू शकतात. ठाणे-कोकण विभागात एकूण ३९ जागांपैकी २३ ते २५ जागा, मुंबईतील एकूण ३६ जागांपैकी २१ ते २६ जागा, उत्तर महाराष्ट्रातील एकूण ३५ जागांपैकी १४ ते १६ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर या IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE यांनी केलेल्या सर्व्हेत १०६ ते १२६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मविआला कुठे किती जागा मिळणार बघा व्हिडीओ?

Published on: Nov 11, 2024 12:05 PM
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? निकालानंतर फैसला, काय म्हणाले अमित शाह अन् शरद पवार?
Pankaja Munde : ‘कमळच हाती घेतलं असतं तर बरं…’, पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंसाठी घेतलेल्या सभेत व्यक्त केली खंत