विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, भोपळा हाती घेऊन आक्रमक; बघा व्हिडीओ
VIDEO | हाती भोपळे घेऊन विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी, विधानभवनाचा परिसर सोडला दणाणून
मुंबई : विधीमंडळाच्या अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज सभागृहात पुन्हा अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे. कालच शिंदे फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यावर जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. तर आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी हाती भोपळे घेऊन आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि या घोषणांनी विधानभवन परिसर चांगलाच दणाणून सोडला. यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे भ्रमाचा भोपळासह इतर घोषणा, निदर्शने करून विरोधकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राला मिळाला भोपळा, शेतकऱ्यांना भोपळा अशा घोषणाही यावेळी विरोधकांनी केल्या.
Published on: Mar 10, 2023 12:24 PM