… ही कोणती धडपड? नवाब मलिक यांच्यावरून राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना चिमटे

| Updated on: Dec 10, 2023 | 11:06 AM

नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यावरून फडणवीसांना घेरणं अद्याप सुरूच आहे. संजय राऊत यांनी मलिक आणि पटेल यांच्यासाठी देशभक्तीची व्याख्या वेगळी आहे का ? असा संजय राऊत यांचा सवाल

मुंबई, १० डिसेंबर २०२३ : नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यावरून फडणवीसांना घेरणं अद्याप सुरूच आहे. संजय राऊत यांनी मलिक आणि पटेल यांच्यासाठी देशभक्तीची व्याख्या वेगळी आहे का ? असा सवाल त्यांनी केला तर यावरूनच राज ठाकरे यांनी ट्वीट करून फडणवीस यांना डिवचलं आहे. सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा आहे. असे म्हणत मलिकांवर देशद्रोहासंबंधित आरोप असल्यामुळे त्यांना महायुतीत घेता येणार नाही. अशी भूमिका फडणवीसांनी घेतली. यानंतर संजय राऊत यांनी महायुतीतील नेत्यांवरच बोट ठेवत हल्लाबोल केलाय. तर राऊत यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दिशा सालियान प्रकरणात अटकेच्या भितीमुळे आदित्य ठाकरे देश सोडून पळाले अशी टीका नितेश राणे यांनी केली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस यांना चिमचे काढले.

Published on: Dec 10, 2023 11:06 AM
छगन भुजबळ यांची जरांगे पाटलांच्या हिंदी बोलण्यावरून नक्कल…म्हणाले, ‘कायको गया गाव मे…’
जालन्यात आधी दगडफेक झाली की लाठीचार्ज? 4 तारखांना ४ वेगळे दावे? देवेंद्र फडणवीस यांचा कोणता दावा खरा?