अमित शाह माफी मांगो अन् ‘जयभीम’च्या घोषणा, लोकसभा-राज्यसभा विरोधकांनी दणाणून सोडली
लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांकडून जयभीमच्या घोषणा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात मोठा गदारोळ झाला. दरम्यान, आज लोकसभा आणि राज्यसभा येथील सभागृहात कामकाज सुरू होताच […]
लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांकडून जयभीमच्या घोषणा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात मोठा गदारोळ झाला. दरम्यान, आज लोकसभा आणि राज्यसभा येथील सभागृहात कामकाज सुरू होताच विरोधी खासदारांकडून ‘जय भीम’च्या घोषणा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर विरोधकांनी अमित शाहांविरोधात आंदोलनही केलं. आधी संसदेच्या बाहेर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी अमित शाह माफी मांगोच्या घोषणा दिल्या. अमित शाह यांनी आंबेडकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्या विरोधात काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. यामध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही सहभागी झाले होते. दरम्यान, आज संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसदेच्या बाहेर हातात डॉ. आंबेडकरांचे फोटो घेऊन जोरदार निदर्शने करत अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे अशी एकच मागणी लावून धरली. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी अमित शाह माफी मांगो आणि जयभीमच्या घोषणा देत सभागृह हादरून सोडलं.