Special Report | देवेंद्र हम साथ साथ, मेरा नाम है एकनाथ! सक्षम नसतो एवढा मोठा कार्यक्रम केला असता का
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे जोरदार घोषणा देत होते. विशेष म्हणजे अधिवेशनाच्या 6 व्या दिवशीही, विरोधकांच्या घोषणा सुरुच होत्या. खावून खावून 50 खोके, माजलेत गद्दार बोके. ईडी ज्यांच्या घरी, तो भाजपच्या दारी. गद्दारांची भाकरी, भाजपची चाकरी आणि ईडी सरकार हाय हाय.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) पुन्हा सभागृहात जोरदार फटकेबाजी केली. शिंदेंनी सुरुवातीलाच, खास चारोळीतून विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा प्रस्ताव स्वत: मुख्यमंत्र्यांनीच मांडला आणि त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला..महाविकास आघाडी सरकारमध्ये आपणच नगरविकास मंत्री असताना जे निर्णय घेतले ते आता का बदलता ?, असा सवाल करताना, विरोधकांनी शिंदेंवर टीकेचे बाण सोडले…त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी केली.
नगराध्यक्ष जनतेतून निवडता तर, मुख्यमंत्रीही जनतेतून निवडा, अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्याही टीकेला शिंदेंनी उत्तर दिलंय.विधानभवनाच्या पायऱ्यांवरील घोषणाबाजीवरुनही, धनंजय मुंडेंना मुख्यमंत्र्यांनी टोले लगावलेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे जोरदार घोषणा देत होते. विशेष म्हणजे अधिवेशनाच्या 6 व्या दिवशीही, विरोधकांच्या घोषणा सुरुच होत्या. खावून खावून 50 खोके, माजलेत गद्दार बोके. ईडी ज्यांच्या घरी, तो भाजपच्या दारी. गद्दारांची भाकरी, भाजपची चाकरी आणि ईडी सरकार हाय हाय.
50 खोके, एकदम ओकेच्या घोषणाबाजीत, विरोधकांनी आणखी धारदार शब्द जोडला केला. खावून खावून 50 खोके, माजलेत गद्दार बोके, अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा डिवचलं. विशेष म्हणजे या घोषणा देण्यासाठी आघाडीवर होते, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड. शिंदे गटाच्या आमदारांना डिवचण्याची संधी विरोधक सोडत नाहीयेत, त्यामुळं अधिवेशन संपेपर्यंत घोषणा सुरुच राहतील, असंच दिसतंय.