राष्ट्रवादीत अजित पवार नाराज? नागपुरच्या वज्रमूठ सभेपूर्वी स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Apr 16, 2023 | 12:41 PM

VIDEO | नाराजीच्या चर्चांवर अजित पवार यांनी स्पष्ट केली भूमिका, वज्रमूठ सभेपूर्वी दिली प्रतिक्रिया

नागपूर : महाविकास आघाडीची आज दुसरी वज्रमूठ सभा नागपूर येथे होणार आहे. या वज्रमूठ सभेची मविआकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्यातील वज्रमूठ सभेबाबत भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील कोण-कोणत्या ठिकाणी पुढील मविआच्या सभा होणार आहेत, त्यासभेत कोणाची भाषणं होणार, याची माहिती दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अजित पवार यांच्यात भेट झाली की नाही यावर विचारण्यात आले असता अजित पवार यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. तर नागपूर हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमपीच असल्याने मविआच्या या सभेकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे. यावर ते म्हणाले प्रत्येक ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे. त्यामुळे तो विभाग कोणाचा न कोणाचा असणार आहे, परंतु आम्ही राज्याच्या वतीने सभा घेत आहोत, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.

Published on: Apr 16, 2023 12:41 PM
उसणं अवसान आणून बोलणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही; शिवसेना नेत्याची राऊत यांच्यावर टीका
वादानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘…आणि मी सत्य बोलले’