थोडसं शांत राहून आत्मपरीक्षण करा, अजित पवार यांचा कुणाला खोचक सल्ला?
आत्मपरिक्षण करावं, आत्मचिंतन करावं, थोडंसं शांत राहून विचार करावा आणि नंतर वक्तव्य करावे, कोणाला दिला अजित पवार यांनी सल्ला?
पुणे : बारामतीमध्ये विजय आमचाच असे म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा त्यांच्याच मतदारसंघात पराभव झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, त्यांनी आत्मपरिक्षण करावं, आत्मचिंतन करावं थोडंसं शांत राहून विचार करावा आणि नंतर वक्तव्य करावे, असा सल्ला त्यांनी बावनकुळे यांना दिला आहे. जुनी पेन्शन योजनेवर बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, लोकांनी मतदानासाठी दिलेला कौल हा नाकारला जातो आणि त्यांच्या मताचा अनादर केला जातो. पदवीधर आणि शिक्षक यांनी सध्या असलेली बेकारी, बेरोजगारी आणि महागाईवर नाराज आहेत आणि ही नाराजी त्यांनी मतपेटीवर व्यक्त केली. काम करत असताना ज्यांचा जो हक्क आणि अधिकार असतो तो अधिकार लोकशाहीमध्ये ज्याला त्याला मिळाला पाहिजे, असे म्हणत अजित पवार यांनी जुनी पेन्शव योजनेवर आपली भूमिका मांडली आहे.