‘काहीजण माईक हातात आल्यावर…’, अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर काय केली टीका?
VIDEO | फडतूस, काडतूसवरून शाब्दिक वार आणि अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
सातारा : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तेव्हापासून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर शिवसेनेचे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना फडतूस गृहमंत्री असल्याचे म्हटले त्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मी फडतूस नाही तर काडतूस आहे असं म्हटलं. यावरूनच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल चढवल्याचे पाहायाल मिळाले. ते साताऱ्यात बोलत असताना त्यांनी काय केली टीका बघा…
Published on: Apr 09, 2023 09:20 PM