ठाकरे यांच्या नावावर निवडून आलेल्यांची ठाकरेंवरच टीका, अजित पवार यांचा कुणावर हल्लाबोल

| Updated on: Feb 11, 2023 | 9:55 AM

VIDEO | ठाकरे यांच्या नावावर निवडून येतात आणि त्यांच्यावरच टीका करतात, काय म्हणाले अजित पवार?

परभणी :  विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदार यांच्यावर नाव न घेता परभणीत चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांकरता मुंबईमध्ये शिवसेना स्थापन केली. हा शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवला आणि महाराष्ट्रात शिवसेना पोहोचवली. एकेदिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी मोठी सभा शिवाजी पार्कात घेतली. यावेळी शेवटच्या काळात त्यांनी सांगितले मी आता वयस्कर झालो, आता शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे घेतील, ते शिवसेना प्रमुख म्हणून काम पाहतील आणि बाळासाहेबांच्या नावावर निवडून आलेले आमदार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताय. युवा नेता असलेले आदित्य ठाकरे पुढे येतंय तर त्यांच्यावरही टीका करताय, असा सवल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. तर ते रॅली काढताय तर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करताय, हा कुठला रडीचा डाव..असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

Published on: Feb 11, 2023 09:55 AM
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी अनेकांची इच्छा पण…; शरद पवार यांचं महत्वाचं वक्तव्य
जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर टीकेची झोड, शरद पवारांची भूमिका काय? पाहा…