Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघात म्हणजे सरकारने केलेली हत्या, कुणी केला हल्लाबोल?

| Updated on: Oct 15, 2023 | 11:41 AM

VIDEO | छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे. समृद्धी महामार्गावर अपघात नाही तर सरकारने केलेल्या हत्या आहेत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

छत्रपती संभाजीनगर, १५ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे. समृद्धी महामार्गावर अपघात नाही तर सरकारने केलेल्या हत्या आहेत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. तर आरटीओ अधिकाऱ्यामुळे झालेल्या या अपघातात आरटीओ अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी अंबादास दानवे यांनी सरकारकडे केली आहे. अपघात नाही तर सरकारने खून केले आहेत. आरटीओच्या पाठलागामुळे हा अपघात झाला आहे. त्यामुळे आरटीच्या अधिकाऱ्यावर कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करा, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी त्या आरटीओ अधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे.

Published on: Oct 15, 2023 11:40 AM
Samruddhi Highway Accident : सैलानी बाबांचं दर्शन घेऊन परतत असताना ‘समृद्धी’वर भीषण अपघात, ट्रक अन् बसची कशामुळं झाली धडक?
Sanjay Raut : समृद्धी महामार्ग शापित अन् त्यावरील बळी म्हणजे…, संजय राऊत यांचा सरकारवर घणाघात