इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायची इच्छा? अंबादास दानवे म्हणाले, त्यांनी यावं…

| Updated on: Dec 26, 2023 | 4:30 PM

इम्तियाज जलील चांगले व्यक्ति पण MIM जातीयवादी पार्टी असल्याचं वक्तव्य विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. इम्तियाज जलील यांनी इंडिया आघाडीत यायची इच्छा व्यक्त केली होती. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, जलील हे चांगले व्यक्ती पण....

मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : इम्तियाज जलील चांगले व्यक्ति पण MIM जातीयवादी पार्टी असल्याचं वक्तव्य विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. इम्तियाज जलील यांनी इंडिया आघाडीत यायची इच्छा व्यक्त केली होती. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायची इच्छा असल्यास त्यांनी MIM पक्ष सोडावा आणि काँग्रेस किंवा शरद पवार गटात जावं असा सल्लाही त्यांनी दिलाय. यावेळी ते असेही म्हणाले की, MIM ही संघटना जातीय वाद फोफावणारी संघटना आहे. अशी संघटना एनडीएबरोबर कशी येऊ शकते? पण इम्तियाज जलील म्हणत असतील तर या सगळ्या नेतृत्वापैकी बऱ्यापैकी नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांची फार काम करण्याची इच्छा असेल तर MIM मध्ये काही होऊ शकत नाही. त्यांनी इंडिया आघाडीत यावं आणि राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये जावं असंही त्यांनी म्हटलंय.

Published on: Dec 26, 2023 04:29 PM
अंगावर हिजाब… मनात राम… मुस्लिम तरुणी निघाली अयोध्येतील प्रभू रामाच्या दर्शनाला
ST Bank : संस्थान खालसा… एसटी बँकेच्या 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा; गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का