शेतकऱ्यांना बजेटमधून काहीच मिळालं नाही : Devendra Fadnavis
गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. कर्जखाती सांगितली नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. नुकसानाीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. विम्याचे पैसेही मिळाले नाहीत. कोरोनात सर्वात जास्त मृत्यू झालेले राज्य का पाट थोपटून घेतंय. असा सवालही त्यांनी केला आहे.
मुंबई : पहिल्या वर्षात आमच्या योजना बंद करणारे सरकार आता पुन्हा त्या योजना सुरू करत आहे. समृद्धी महामार्गपासून मेट्रोपासून बुलेट ट्रेनला विरोध केला आणि आता पुन्ह घोषणा करत आहे.त्यामुळे हसावे की रडावे ते कळेना. असेही ते म्हणाले आहेत. शेतकऱ्यांसाठी दोन वर्षापूर्वीच घोषणा आज पुन्हा केली. गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. कर्जखाती सांगितली नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. नुकसानाीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. विम्याचे पैसेही मिळाले नाहीत. कोरोनात सर्वात जास्त मृत्यू झालेले राज्य का पाट थोपटून घेतंय. असा सवालही त्यांनी केला आहे.