वडेट्टीवारांच्या शासकीय बंगल्याला गळती; सरकारवर टीका करत म्हणाले… “लाडकी बहीण, भाऊ, सासू अन् मामा…”
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितीगड या शासकीय बंगल्याला गळती लागली आहे. अवघ्या काही दिवसांतच विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितीगड या शासकीय बंगल्याला गळती लागली आहे. शासकीय निवासस्थानाला गळती लागल्यामुळे बादल्या अन् भांडी लावायला लागली आहेत.
विरोधी पक्षनेत्याच्या शासकीय निवासस्थानाला गळती लागल्याचे समोर आले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितीगड या शासकीय बंगल्याला गळती लागली आहे. अवघ्या काही दिवसांतच विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितीगड या शासकीय बंगल्याला गळती लागली आहे. शासकीय निवासस्थानाला गळती लागल्यामुळे बादल्या अन् भांडी लावायला लागली आहेत. काही महिन्यांपूर्वीच प्रचितीगड या शासकीय निवासस्थानावर लाखो रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र तरीही शासकीय निवासस्थानाच्या छताला गळती लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शासकीय निवासस्थान गळतीच्या मुद्यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘काही महिन्यांपूर्वी याचं काम झालं आहे. कितीही योजनांचा पाऊस पाडू द्या, मात्र काहीही फरक पडणार नाही. गेल्या आठ दिवसापासून माझा टेलिफोन देखील बंद आहे. याबाबत अनेक तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र काहीही दखल घेतली नाही’, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.