महाराष्ट्रातील ‘या’ 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा ईव्हीएमवर संशय अन्…

| Updated on: Nov 30, 2024 | 3:48 PM

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हीएममध्ये काहीतरी बिघाड झाल्याचा पराभूत झालेल्या उमेदवारांने संशय व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या २४ उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात राज्यभरात मोहीम सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हीएममध्ये काहीतरी बिघाड झाल्याचा पराभूत झालेल्या उमेदवारांने संशय व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या २४ उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. या २४ उमेदवारांनी ईव्हीएममधील मतमोजणीवर संशय व्यक्त केला आहे. यामध्ये यामध्ये संगमनेरचे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात, पुणे कॅन्टोनमेंटचे उमेदवार रमेश बागवे, कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदे, नगर शहर अभिषेक कळमकर, पारनेरच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राणी लंके, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राहुरीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे, कोपरगावचे संदीप वरपे, विक्रमगडचे सुनील भुसारा, हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, शिरूरचे अशोक पवार, खडकवासल्याचे सचिन दोडके, चिंचवडचे राहुल कलाटे, पवार गटाचे तुमसरचे उमेदवार चरण वाघमारे, अणुशक्तीनगरचे फवाद अहमद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरी पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघे, ठाणे शहरचे उमेदवार राजन विचारे, ओवळा माजिवड्याचे नरेश मणेरा, डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे, ऐरोलीचे एम. के. मडवी, बविआचे वसईचे उमेदवार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे उमेदवार क्षितीज ठाकूर बोईसरचे उमेदवार राजेश पाटील यांचा समावेश आहे.

Published on: Nov 30, 2024 03:48 PM
‘संजय राऊत मेंटल, पागल… त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा…’, शिंदेंच्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
राज्यात ‘मी पुन्हा येईन…’, 5 डिसेंबरला ‘या’ ठिकाणी नव्या सरकारचा शपथविधी; भाजपची जोरदार तयारी अन्…