अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष, ‘रुपाली vs रुपाली’ वाद पेटला, नाराजीचं कारण काय?

| Updated on: Sep 05, 2024 | 2:28 PM

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र या आमदारकीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

एकाच महिलेला किती पदे देणार? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. रूपाली चाकणकरांच्या नावाच्या चर्चेवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर यासंदर्भात रूपाली चाकणकर यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार दादा न्याय देतील, असा विश्वास रूपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, रूपाली चाकणकर यांचं नाव कालपासून चर्चेत आहे त्यावर रूपाली पाटील ठोंबरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले की, “एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे, बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

Published on: Sep 05, 2024 01:45 PM
Mumbai Weather Update : गणेशोत्सवावर पावसाचं सावट; जाणून घ्या,पुढील काही दिवसांचे अपडेट
Ganesh Utsav 2024 : लाडक्या बाप्पाला काय नैवेद्य द्यावा, तुम्हाला प्रश्न पडलाय? इथे मिळेल छप्पन भोग