मंत्री मलिक आता बिनखात्याचे मंत्री

| Updated on: Mar 18, 2022 | 10:02 PM

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षांकडून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपमधील नेत्यांसह विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने आता मध्यम मार्ग काढत त्यांच्याकडील मंत्री पदाचा कार्यभार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे असेलेल्या पालकमंत्री पदाचा कार्यभारही काढून घेतला जाणार आहे. त्यांच्याकडे असणारे अल्पसंख्याक खाते हे इतर […]

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षांकडून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपमधील नेत्यांसह विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने आता मध्यम मार्ग काढत त्यांच्याकडील मंत्री पदाचा कार्यभार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे असेलेल्या पालकमंत्री पदाचा कार्यभारही काढून घेतला जाणार आहे. त्यांच्याकडे असणारे अल्पसंख्याक खाते हे इतर मंत्र्यांकडे देण्यात येणार असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच त्यांचा कार्यभार काढून घेतला जाणार आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका करत त्यांनी दाऊद इब्राहिमचा पुन्हा एकदा विषय काढून हा विषय छेडला.

संजय राऊत यांची शाब्दीक धुळवड
कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे Satyajit Kadam यांचं नाव