ललित पाटील प्रकरणाची चर्चा अधिवेशनात…फडणवीस म्हणाले, संजीव ठाकूर चुकले पण…
ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी विरोधकांनी सरकारला सवाल केले. चौकशी समितीने या प्रकरणात ससून रूग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर ठपका ठेवलाय. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पदमुक्त करण्यात आलंय, मात्र बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई
मुंबई, १३ डिसेंबर २०२३ : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात ससूनच्या डीनवर कारवाई का नाही? यावरून सभागृहात मुद्दा मांडला. ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी विरोधकांनी सरकारला सवाल केले. चौकशी समितीने या प्रकरणात ससून रूग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर ठपका ठेवलाय. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पदमुक्त करण्यात आलंय. तर बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली. दरम्यान, ९ महिने ललित पाटील कसं काय उपचार घेत होता. याची शहानिशा करणं संजीव ठाकूर यांची ड्यूटी होती. हे मान्य करतांना अजून याप्रकरणी तपास सुरू आहे असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हणाले. ड्रग्ज तयार करणारा आरोपी पुण्यातील येरवडा जेलमध्ये होता. मात्र ९ महिने ललित पाटीलने उपाचारांच्या नावाखाली मुक्काम ठोकला. धक्कादायक म्हणजे त्याने रूग्णालयातून ड्रग्जच रॅकेट चालवलं. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट