मुंबईचे हाल! मुसळधार!! 24 तासात 163 मिलीमीटर पाऊस
संपूर्ण शहरात रेल्वे आणि बससेवेला मोठा फटका बसला. मोसमातील पहिल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले.
मुंबई: मुसळधार आयएमडीने ऑरेंज अलर्ट (Mumbai Orange Alert) जारी केला आहे, तर हवामान विभागानेही 1 आणि 2 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे. संपूर्ण शहरात रेल्वे आणि बससेवेला मोठा फटका बसला. मोसमातील पहिल्या मुसळधार (Heavy Rainfall) पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले, अशी माहिती नागरी अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत 24 तासात 163 मिलीमीटर पाऊस झालेला आहे.