Maratha Reseration : ‘त्या’ मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार? राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काय दिले आदेश?
राज्यात आतापर्यंत जेवढ्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात शिंदे समितीला आतापर्यंत ५० हजारांहून अधिक नोंदी सापडल्या आहेत. जेवढ्या नोंदी सापडल्या तेवढ्या मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे महसूल विभागाचे मुख्य सचिवांकडून आदेश देण्यात आले आहे.
मुंबई, १८ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील हे २० जानेवारी रोजी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून थेट मुंबईकडे पायी रवाना होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच राज्य सरकारची पळापळ सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आतापर्यंत जेवढ्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात शिंदे समितीला आतापर्यंत ५० हजारांहून अधिक नोंदी सापडल्या आहेत. जेवढ्या नोंदी सापडल्या तेवढ्या मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे महसूल विभागाचे मुख्य सचिवांकडून आदेश देण्यात आले आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या, असे राज्याच्या मुख्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश दिले आहेत. सर्वच जिल्ह्यात शिबीर भरवून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे आदेश मुख्य सचिव यांच्याकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.