बारसू रिफायनरी विरोधात ठाकरे गटाचा मोर्चा, नेतृत्व करणार ‘हा’ नेता?

| Updated on: Apr 28, 2023 | 9:37 AM

VIDEO | रत्नागिरीतील बारसूच्या माळरानावर आज कडेकोट बंदोबस्त, बारसूविरोधातील आंदोलक आणि पोलिसांत जुंपण्याची शक्यता

रत्नागिरी : रत्नागिरीतील बारसू रिफायनरी (Barsu Refinery Project) विरोधात आज मोर्चा निघणार आहे. बारसू रिफायनरी विरोधातील मोर्च्याचं बारसूच्या माळरानावर आयोजन करण्यात आले आहे. या भव्य मोर्चाचं नेतृत्व ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत करणार असल्याचे सांगितले जात आहे. बारसू रिफायनरी विरोधात आज निघणाऱ्या भव्य मोर्चाच्या अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांचा बारसूमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, रिफायनरीविरोधी नेत्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाल्याचे पाहायला मिळतंय. रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते अशोक वालम हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. तर आम्ही त्यांच्याबरोबर असल्याचाही दावा करण्यात आला होता.

Published on: Apr 28, 2023 09:37 AM
बारसू रिफायनरीवरून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात एक वाक्यता नाहीच; ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
मावळात रंगली छकडी बैलगाडा शर्यत; कुणी मारली बाजी?