तुळजाभवानी मंदिरात 11 पुजाऱ्यांना प्रवेशबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
तुळजाभवानी मंदिरात गैरवर्तन करणाऱ्या 11 पूजाऱ्यावर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या पूजाऱ्यांना तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर प्रवेश बंदीच्या कारवाईचा दणका दिला आहे.
तुळजाभवानी मंदिरात गैरवर्तन करणाऱ्या 11 पूजाऱ्यावर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांना तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर प्रवेश बंदीच्या कारवाईचा दणका दिला आहे. गाभाऱ्यात प्रवेश बंदी असताना अनधिकृत प्रवेश करणे, गाभाऱ्यात फोटो काढणे,बेशिस्त वर्तन, सुरक्षा रक्षक यांच्याशी हुज्जत घालणे, भाविकांना मंदिरात घुसविणे या कारणाने ही कारवाई करण्यात आली आहे. अनेक पूजाऱ्यावर कारवाई केल्याने पूजाऱ्यात खळबळ उडाली आहे तर अन्य इतर पूजाऱ्यांनाही नोटीसा दिल्या आहेत.
तुळजाभवानी मंदिर संस्थानने तक्रार दाखल करण्यासाठी व्हाट्स अँप सुविधा सुरु केली होती त्यात आलेल्या तक्रारी व सीसीटीव्ही फुटेज यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. 11 पुजारी यांच्या विरोधात एक महिना ते तीन महिना मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे. स्वप्नील भोसले व ओंकार खुंटाफळे यांच्यावर देऊळ कवायतच्या कलम 36 नुसार कारवाई करण्यात आली आहे तसेच आपणास सहा महिने मंदिर प्रवेश बंदी का करण्यात येऊ नये अशी नोटीस दिली आहे