OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी आमचा प्रयत्न सुरूच राहील; अजितदादांची ग्वाही

| Updated on: May 19, 2022 | 11:41 AM

न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणुका घेऊ, मात्र हे करत असताना ओबीसी आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे : निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कारागृहातील कैद्यांसाठी स्पर्धा भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचे उद्घाटन अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यामार्फत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) निवडणुकीसंदर्भात निर्णय दिला. त्यानंतर या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणुका घेऊ, मात्र हे करत असताना ओबीसी आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Published on: May 19, 2022 11:37 AM
Aurangzeb Tomb | औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद, औरंगाबादेत पुरातत्त्व विभागाचा महत्त्वाचा निर्णय
VIDEO : Sandeep Deshpande मुंबईत परतल्यावर राज ठाकरेंची भेट घेणार