संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा, आम्ही खुल्या चर्चेला तयार
संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा. पण संसदेत शांतता राखा. संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवा, असं आवाहन करतानाच आम्ही कोणत्याही खुल्या चर्चेला तयार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं.
नवी दिल्ली: संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा. पण संसदेत शांतता राखा. संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवा, असं आवाहन करतानाच आम्ही कोणत्याही खुल्या चर्चेला तयार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीडियाशी संवाद साधून सरकारची भूमिका व्यक्त करतानाच विरोधकांकडून सरकारच्या अपेक्षाही विशद केल्या. भविष्यात संसदेचं मूल्यमापन करताना संसद कशी चालवली आणि किती चांगलं योगदान दिलं गेलं याचं मूल्यमापन केलं गेलं पाहिजे. कोणी किती विरोध केला आणि जोर लावला हे मूल्यमापनाचे मानदंड असू शकत नाही.
संसदेत किती तास काम झालं. कोणत्या विषयावर काम केलं हे महत्वाचं आहे, असं सांगतानाच आम्ही कोणत्याही चर्चेला तयार आहोत. कोणत्याही प्रश्नाची उत्तरे द्यायला तयार आहोत. तुम्ही संसदेत प्रश्न विचारा. पण संसदेत शांतताही राखा, असं आवाहन मोदींनी केलं.