आमचे हात बांधलेले नाहीत, आम्हालाही दगड हातात घेता येतो- राज ठाकरे

| Updated on: Apr 17, 2022 | 12:57 PM

आमचे हात बांधलेले नाहीत. आम्हालाही दगड हातात घेता येतो. समोर जे काही हत्यार असेल ते हत्यार आमच्या हातात देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरलं आहे. आमच्याकडून मिरवणुका निघतात, त्यावर दगडफेक होत असीतल तर आम्ही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत. आम्हालाही दगड हातात घेता येतो. समोर जे काही हत्यार असेल ते हत्यार आमच्या हातात देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. एमआयएमकडून (mim) छेडेंगे तो छोडेंगे नही असा इशारा देण्यात आला आहे. त्यावरही राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. आमचे हात काय बांधलेले आहेत का? असा सवाल राज यांनी केला.

Published on: Apr 17, 2022 12:57 PM
अमरावतीत रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिक धडकले; हनुमान चालीसावरून वातावरण तापलं
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 17 April 2022