‘आमचा मुस्लिम समुदाय उद्धव ठाकरेंसोबत आहे’

| Updated on: Jul 24, 2022 | 2:22 PM

"उद्धव ठाकरेंसोबत आज आमची सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आज आम्ही खूप आनंदी आहोत. मातोश्रीवर येऊन पक्षप्रमुखांचं दर्शन झालं. त्यांचे विचार ऐकले, आम्ही आज भारावून गेलो आहोत"

मुंबई: “उद्धव ठाकरेंसोबत आज आमची सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आज आम्ही खूप आनंदी आहोत. मातोश्रीवर येऊन पक्षप्रमुखांचं दर्शन झालं. त्यांचे विचार ऐकले, आम्ही आज भारावून गेलो आहोत” असं मालेगावहून आलेल्या शिवसेना नगरसेवकाने सांगितलं. “विशेष म्हणजे मालेगाव शहर आणि नांदगाव तालुका तिथले दोन आमदार बंडखोरी करुन निघून गेले, तिथे शिवसेना जोमाने कशी काम करेल, भगवा कसा फडकेल, याबाबत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं”, असं या नगरसेवकाने सांगितलं. “आमचा मुस्लिम समुदाय उद्धव ठाकरेंसोबत आहे. जास्तीत जास्त लोकांनी उद्धव ठाकरेंची साथ द्यावी” असं मालेगावहून आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांने सांगितलं.

Published on: Jul 24, 2022 02:22 PM
VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 24 july 2022
‘मुंबईला श्वास घेऊन द्या’, आरे वाचवण्यासाठी आपचं आंदोलन