Panchavati Express Anniversary : पंचवटी एक्सप्रेसचा 49 वा वाढदिवस जल्लोषात, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन

| Updated on: Nov 01, 2024 | 5:31 PM

पंचवटी एक्सप्रेस सुपरवयाझर रोहित भालेराव यांच्या संकल्पनेतून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मनमाडच्या रेल्वे यार्डात भल्या पहाटे केक कापून पंचवटी एक्सप्रेसचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

Follow us on

नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसचा ४९ वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. पंचवटी एक्सप्रेस सुपरवयाझर रोहित भालेराव यांच्या संकल्पनेतून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मनमाडच्या रेल्वे यार्डात भल्या पहाटे केक कापून पंचवटी एक्सप्रेसचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी पंचवटी एक्स्प्रेसला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. एटीएल, पार्क स्टाफ, सी एन डब्ल्यू स्टाफच्यावतीने केक कापून आणि लाडूंचे वाटप करून सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी गाडीचे पूजन करून नारळही वाढविण्यात आला. गेल्या ४९ वर्षापासून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील प्रवाशी तसेच चाकरमानी, विद्यार्थी, व्यापारी पंचवटी एक्सप्रेसमधून अविरत प्रवास करत आहे. ही गाडी नाशिकची जीवन वाहिनी समजली जाते. पुढच्या वर्षी पंचवटी एक्सप्रेसचे अर्धशतक पूर्ण होत असून, या गाडीचा प्रवास असाच अविरत सुरू राहण्याची प्रार्थना यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.