आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं निधी मिळणार, काय आहे राज्य सरकारची घोषणा, बघा व्हिडीओ
VIDEO | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी सरकार वापरणार यंत्रणा, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं निधी मिळणार असल्याची मोठी घोषणा केली. नैसर्गिक नुकसानामुळे बाधित शेतकऱ्यांना ७ हजार ९३ कोटी रूपये निधी वितरीत करण्यात आला. यापूर्वी निकषात नसलेल्या शेतकऱ्यांना पावसासाठी मदत मिळत नसेल पण आता ती वर्गवारी करून शेतपीक नुकसानासाठी ठराविक निकषाने मदत देण्यात येईल. तर नैसर्गिक अपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे वेळेत व्हावे म्हणून मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई पंचनामे तसेच तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळाली म्हणून सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरली जाणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Published on: Mar 09, 2023 04:16 PM