Pandharpur : गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गर्दी

| Updated on: Apr 02, 2022 | 11:20 AM

आज गुढीपाडवा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. तसेच याच वर्षी हिंदू नववर्षाची देखील सुरुवात होते. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी भाविकांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गर्दी केली आहे.

आज गुढीपाडवा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. तसेच याच दिवशी हिंदू नववर्षाची देखील सुरुवात होते. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी भाविकांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गर्दी केली आहे. गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वेगवेगळ्या 21 प्रकारच्या दोन टन फळा फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त अशोक मोरे यांनी केली आहे.यामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा , सभामंडप, चार खांबी , सोळाखांबी सभामंडप तसेच मंदिराच्या प्रवेश द्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

गुढीपाडव्यानिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी
Gudhi Padva : राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, शोभायात्रेत तारे-तारकांचाही सहभाग