Pandharpur | मुलाला क्रिकेट खेळण्यासाठी बापाने चक्क 5 एकर द्राक्षबाग उपटली
पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे राहणारे बागायतदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मुलाचे लॉकडाऊनमुळे क्रिकेट खेळ बंद झालं असल्याने चक्क पाच एकर द्राक्षबाग उपटून क्रिकेट स्टेडियमचे काम सुरु केले आहे. मुलाच्या क्रिकेटवेडापाई बापानं चक्क आपल्याच शेतात स्टेडियम उभारण्यास सुरुवात केली आहे.
पंढरपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या दीड महिन्यापासून राज्यामध्ये संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिकही घरी बसून आपल्या आवडी निवडीला वाव देताना दिसतात. मात्र पंढरपुरातील एका बापाने मुलाची क्रिकेटची हौस पूर्ण करण्यासाठी पाच एकर वावरात क्रिकेटचं स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नुसता निर्णयच घेतला नाही तर चक्क स्टेडियम बांधण्यास सुरुवातदेखील केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे राहणारे बागायतदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मुलाचे लॉकडाऊनमुळे क्रिकेट खेळ बंद झालं असल्याने चक्क पाच एकर द्राक्षबाग उपटून क्रिकेट स्टेडियमचे काम सुरु केले आहे. मुलाच्या क्रिकेटवेडापाई बापानं चक्क आपल्याच शेतात स्टेडियम उभारण्यास सुरुवात केली आहे.
Published on: Jun 06, 2021 07:46 PM