Viral Video: फु बाई फु… फुगडी फु! पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान या वारीत एक विशेष गोष्ट पाहायला मिळतीये, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Police Fugadi Viral Video) होतोय. व्हिडीओ आहे पोलीस फुगडी खेळतानाचा...
Pandharpur Wari 2022: आषाढी एकादशी सोहळा आनंदात पार पडला. 20 जूनला देहू मधून संत तुकाराम (Sant Tukaram) महाराजांची आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघाली. यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो. यावर्षी तब्बल 2 वर्षांनी पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) पार पडली. वारीत माऊलींची गर्दीच गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान या वारीत एक विशेष गोष्ट पाहायला मिळतीये, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Police Fugadi Viral Video) होतोय. व्हिडीओ आहे पोलीस फुगडी खेळतानाचा…
Published on: Jul 11, 2022 12:35 PM