‘चलो भगवान भक्तीगड…!’, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदाच दसरा मेळाव्यासाठी एकत्र, धनंजय मुंडेंकडून ट्विट

| Updated on: Oct 10, 2024 | 1:54 PM

भाजप नेत्या आणि बीडच्या आमदार पंकजा मुंडे आणि राज्याचे कृषिमंत्री, परळीचे आमदार, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मुंडे हे दोघेही पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात एकत्र पाहायला मिळणार आहे.

यंदा दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र दिसणार आहे. मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदाच एकत्र दसरा मेळावा घेणार आहेत. चलो भगवान भक्तीगड…! असं म्हणत धनंजय मुंडे यांनी दसरा या सणाच्या निमित्ताने होणाऱ्या दसरा मेळाव्या संदर्भात एक ट्विट केले आहे. यासोबत त्यांना भगवान बाबा यांचा फोटो देखील पोस्ट केला आहे. सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय. असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तर दरवर्षी पंकजा मुंडे या भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा घेत असतात. मात्र यंदा धनंजय मुंडे देखील या भगवान गडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये चलो भगवान भक्तीगड…! असं म्हणत आपला दसरा, आपली परंपरा…! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या…! असं म्हटलं आहे.

Published on: Oct 10, 2024 01:54 PM
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय, राज्य सरकारचा जीआर
‘डुप्लिकेट… येवल्याचा नेता आता कुठे गेला?’, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा