भाऊ की ताई? परळीमध्ये युतीधर्म कोण पाळणार? देवदर्शन यात्रेतून पंकजा मुंडे यांचं शक्तिप्रदर्शन?
VIDEO | अजित पवार यांचा पुण्यात जीव गुंतला, पण नेमकं कारण काय? तर दुसरीकडे देवदर्शन यात्रेतून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं शक्तिप्रदर्शन? दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर पंकजा मुंडे यांचं कमबॅक
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झालेत. तर याच दोन महिन्यात मोठ्या राजकीय उलथा-पालथीसुद्धा झाल्यात. अजित पवार यांचा गट सत्तेत गेलाय, तर परळी जी कधी मुंडे विरूद्ध मुंडे संघर्षाचं केंद्र होती ती आता मुंडे विरूद्ध पवार संघर्षाचं ठिकाण बनली. राष्ट्रवादी फुटीनंतर झालेल्या बीडमधील सभामुळे बीड दोन्ही पवार यांच्या संघर्षाचा केंद्र बनलाय. दोघांच्या शक्तिप्रदर्शनानंतर आता पंकजा मुंडे सक्रीय राजकारणात आल्यात. दोन महिने पंकजा मुंडे राजकारणातील घडामोडींपासून लांब होत्या. त्या ब्रेकनंतर पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रेची घोषणा केली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही यात्रा सुरू होईल. ११ दिवसात विविध १० जिल्ह्यातून यात्रा जाईल कुठून होणार या यात्रेची सुरूवात आणि शेवट कुठे होणार बघा स्पेशल रिपोर्ट