Pankaja Munde | चिक्की घोटाळ्याचे आरोप बिनबुडाचे, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

Pankaja Munde | चिक्की घोटाळ्याचे आरोप बिनबुडाचे, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

| Updated on: Aug 14, 2021 | 7:33 PM

लातूरमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही पंकजा यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील वाढत्या गुंडगिरीवरुन धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केलाय.

लातूर : माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की घोटाळ्यावरुन धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर जोरदार टोला लगावला आहे. याबाबत विचारलं असता चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिलंय. लातूरमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही पंकजा यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील वाढत्या गुंडगिरीवरुन धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केलाय.

Video | सचिन अहिर यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी काय सहकार्य केले? इम्तियाज जलील यांचा सवाल TV9
Washim | गडकरींच्या रस्त्याच्या कामाला सेनेचा कधीच विरोध नाही, संपूर्ण आरोप खोटे – माधव ठाकरे